Pune: पुण्यात आता गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित कॅमेरे बसवले जाणार आहेत. एकूण 2,886 कॅमेरे शहरात विविध ठिकाणी लावले जातील, ज्यांचा उद्देश गुन्हेगारी कृत्यांवर लक्ष ठेवणे आणि सुरक्षा मजबूत करणे आहे.
यासाठी सुमारे 43३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या AI कॅमेर्यांची मदत गुन्हेगारांची ओळख पटविण्यात, त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात, तसेच रहदारी नियंत्रण आणि शहरातल्या सुरक्षिततेसाठी उपयोगी ठरणार आहे.
वाढती गुन्हेगारी लक्षात घेता, हा निर्णय महत्त्वाचा ठरतो, कारण त्याद्वारे शहरातला कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अधिक मजबूत केली जाऊ शकते.