पुण्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर अजूनही पाण्याखाली आहे. आज पहिला श्रावण सोमवार असून या दिवशी मंदिरात मोठी गर्दी असते, मात्र मंदिर परिसर पाण्याखाली गेल्याने भाविकांना दर्शन घेता येत नाही.
मंदिर परिसरात तसेच गाभाऱ्यात पाणी शिरले असल्याने सकाळच्या वेळी मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे. मंदिरातील पाणी ओसरल्यानंतरच मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.