पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. व्यसनाच्या आहारी गेलेल्या 21 वर्षीय अनुप लोखंडे या युवकाने व्यसनमुक्ती केंद्रात आत्महत्या केली.
अनुपला गेल्या सहा महिन्यांपासून अंमली पदार्थांचे व्यसन होते, त्यामुळे या व्यसनातून मुक्त होण्यासाठी त्याला नित्यानंद व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्यात आले.
मात्र, तेथेच त्याने गळफास लावून आपले जीवन संपवले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.