स्वप्नील कुसळेने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कांस्यपदक जिंकून महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव उंचावले आहे . त्यांच्या या ऐतिहासिक यशानंतर पुण्यात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषात पुण्यात आलेल्या स्वप्नीलने दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि आरतीही करण्यात आली.
स्वप्नील कुसाळे हा कोल्हापुरचा खेळाडू आहे , रेल्वेत नोकरी करत असताना त्याने नेमबाजीत आवड निर्माण केली. पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये त्याने देशासाठी पदक जिंकले, त्यामुळे त्याच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुण्यात भव्य रॅलीने त्यांचे स्वागत करण्यात आले, तसेच पदकासाठी त्यांचे अभिनंदन करण्यात आले.