रक्षाबंधन हा सण भावंडांमधील प्रेम आणि आपुलकी दर्शवण्यासाठी साजरा केला जातो. जर तुम्ही भावाला त्याच्या राशीच्या रंगानुसार राखी बांधली, तर ती राखी भावाच्या आयुष्यात प्रगती आणि शुभत्व घेऊन येऊ शकते. चला जाणून घेऊया कोणत्या राशीच्या भावाला कोणत्या रंगाची राखी बांधावी:
मेष राशी: लाल रंगाची राखी – हा रंग उत्साह, ऊर्जा आणि यशाचे प्रतीक आहे.
वृषभ राशी: पांढऱ्या रंगाची राखी – पांढरा रंग शांतता आणि श्रद्धेचे प्रतीक आहे.
मिथुन राशी: हिरव्या रंगाची राखी – हा रंग चैतन्य, समृद्धी, आणि उत्साहाचे प्रतीक आहे.
कर्क राशी: पांढरा किंवा पिवळा रंग – पांढरा रंग शांतता आणि धैर्य देणारा, तर पिवळा रंग उत्साह आणि तेजाचे प्रतीक आहे.
सिंह राशी: लाल किंवा पिवळा रंग – हे रंग राग नियंत्रणात ठेवून, सकारात्मक उर्जा निर्माण करतात.
कन्या राशी: नारंगी रंग – हा रंग शौर्य आणि उत्साहाचे प्रतीक आहे.
तूळ राशी: पांढऱ्या रंगाची राखी – हा रंग शितलता आणि शांततेचे प्रतीक आहे.
वृश्चिक राशी: लाल किंवा गुलाबी रंग – हे रंग व्यवसायात आणि नोकरीत यश मिळवून देतात.
धनु राशी: सोनेरी रंगाची राखी – हा रंग सुखाचे सोनेरी क्षण घेऊन येतो.
मकर राशी: निळ्या रंगाची राखी – निळा रंग करिअर आणि प्रगतीला चालना देतो.
कुंभ राशी: गडद रंगाची राखी – गडद रंग करिअरला उभारी देणारा ठरतो.
मीन राशी: आकाशी किंवा पिवळा रंग – हे रंग स्थैर्य आणि प्रगतीला चालना देतात.
यावर्षी रक्षाबंधनला राजयोग असल्यामुळे काही राशीच्या बहीण-भावांना विशेष लाभ होणार आहे. या राशी आहेत: मेष, वृषभ, मिथुन, सिंह, कुंभ, आणि मीन.
रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा!