Home / Weather / Pune Weather News: पुण्यात परतीच्या पावसाचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जारी

Pune Weather News: पुण्यात परतीच्या पावसाचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जारी

Pune Weather News

Pune: पुण्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून शहरात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे, आणि पुढच्या 24 तासांसाठी हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा देत रेड अलर्ट जारी केला आहे. khadakwasla rain update, panshet rain news

विशेषत: पुणे जिल्ह्याच्या खडकवासला, पानशेत, आणि वरसगाव धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्याने मुठा नदीत विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

अतिरिक्त पाणी सोडण्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरण क्षेत्रात पाऊस कायम राहिल्यास पाण्याचा विसर्ग वाढू शकतो, त्यामुळे नागरिकांना नदीपात्रापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुढील 24 तासांमध्ये रायगड आणि रत्नागिरीसह पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीसह वादळी वारे आणि विजांचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे संभाव्य पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.


Tags: , , , ,
Scroll to Top