Home / Travel / कास पठार online बुकिंग कसे करावे? बुकिंग केल्या शिवाय एन्ट्री नाही

कास पठार online बुकिंग कसे करावे? बुकिंग केल्या शिवाय एन्ट्री नाही

how-to-book-online-to-visit-kas-plateau

या पावसाळ्यात आपण जर travel करण्याचा प्लॅन बनवत असाल तर महाबळेश्वर, कास पठार, पाचगणी हे चांगले ठिकाण आहे. पण जर तुम्ही कास पठार पाहण्यासाठी जात असाल तर तुम्हला हे माहित असं गरजेचं आहे कि कास पठार (world heritage sites) पाहण्यासाठी पहिल्यांदा ऑनलाईन स्लॉट बुक करणे आवश्यक आहे, तर तुम्ही स्लॉट बुकिंग केला नसेल तर तुम्हला एन्ट्री मिळणार नाही. तर बुकिंग कशी करायची हे तुम्हला खालील प्रमाणे दिले आहे .

कास पठार चे Slot

कास पठारावर दररोज फक्त ३००० visitor ला एन्ट्री असते, ते ३ स्लॉट मध्ये divide केले आहे. प्रत्येक स्लॉट हा १००० visitor चा आहे. खालील प्रमाणे स्लॉट ची माहिती दिली आहे.

प्रवेश शुल्क: प्रती व्यक्ती रू.150/- ऑनलाईन बुकींग केल्यास प्रिंट असणे अनिवार्य, मोबाइल स्क्रीनशॉट ग्राह्य समजले जाणार नाही (12 वर्षांखालील मुलांना प्रवेश मोफत).
Slot TimingVisitors
Morning Slot7.00 am to 11.00 am1000 visitors
Afternoon Slot11.00 am to 3.00 pm1000 visitors
Evening Slot3.00 pm to 6.00 pm1000 visitors

अस्या प्रकारे ३ slot मध्ये तुम्ही कास पठार ला भेट देऊ शकता.

Slot Booking Process Of Kas Plateau

Slot बुक करण्यासाठीच्या स्टेप खालील प्रमाणे आहेत, या मुले तुम्हला बुकिंग मध्ये कोणतीही अडचण येणार नाही.

Step 1 – सर्व प्रथम कास पठार च्या official website (https://www.kas.ind.in/) ला visit करा.

Step 2 – Website ओपन झाल्यावर मेनू मध्ये Booking टॅब वर क्लिक करणे.

Step 3 – बुकिंग टॅब वर क्लिक केल्यावर Kas Visit Registration फॉर्म ओपन होईल.

Step 4 – तो फॉर्म भरणे (आपण जर ग्रुप ने गेला असेल तर एकच फॉर्म वर visitor चे नंबर टाकवे, प्रेत्येकासाठी वेगळा फॉर्म भरायची गरज नाही.) फॉर्म भरून झाल्यावर Submit या बटनावर क्लिक करावे.

Step 5 – Submit केल्यावर Payment चा Option येईल, payment केल्यावर आपला entry पास डाउनलोड होईल.

Step 6 – एन्ट्री करायच्या वेळेस एन्ट्री पास ची प्रिंट आपल्यासोबत असणे आवश्यक आहे.

कास पठारावरील इतर सुविधा

पर्यटकांच्या सोयी साठी कास पठारावर इतर काही सुविधा उपलब्ध आहेत, त्या सुविधांची माहिती खालील चार्ट मध्ये दिली आहे.

पार्किंग व बससेवामोफत (पार्किंग पासून पठारावर जाण्यासाठी बससेवा उपलब्ध आहे.)
शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत शुल्क प्रति व्यक्ती रु.40/-. शाळा / कॉलेज प्रमुखांचे पत्र अनिवार्य. पत्र नसल्यास सवलत दिली जाणार नाही. शनिवार, रविवारी सवलत दिली जाणार नाही.
गाईड सुविधा शुल्क – रु.100/- प्रति तास. (दहा व्यक्तींसाठी एक गाईड दिला जाईल)

Tags: , , , ,
Scroll to Top
Budget 2024 impacts on mutual funds, three categories of taxation OnePlus Nord CE 4 Lite Quick Review
Budget 2024 impacts on mutual funds, three categories of taxation OnePlus Nord CE 4 Lite Quick Review