Home / Crime / Nilesh Ghaiwal Attack: कुख्यात गुंड निलेश घायवळ ला चोप

Nilesh Ghaiwal Attack: कुख्यात गुंड निलेश घायवळ ला चोप

Nilesh Ghaiwal Attack

धाराशिव – पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळवर धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील आंद्रड गावात कुस्तीच्या फडातच हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेच्या वेळी ही घटना घडली.

निलेश घायवळ हा आयोजकांसोबत कुस्तीच्या मैदानात राऊंड मारत होता आणि उपस्थित पैलवानांना भेटून शुभेच्छा देत होता. याचवेळी अचानक एका पैलवानाने त्याच्यावर धाव घेत मारहाण केली. या घटनेमुळे कुस्ती मैदानात एकच खळबळ उडाली.

हल्ल्यानंतर निलेश घायवळचे समर्थक आणि उपस्थित नागरिकांनी तत्काळ हस्तक्षेप केला. निलेश घायवळ घटनास्थळावरून तात्काळ निघून गेला. या हल्ल्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हे पूर्ववैमनस्यातून झाले का, याची चौकशी सुरू आहे.

निलेश घायवळवर याआधीही गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोका, खून, खंडणी, दरोडा, जीवघेणा हल्ला, मारामारी यांसारखे दहा पेक्षा अधिक गुन्हे नोंद आहेत.

हल्ला करणारा पैलवान हा अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील असल्याची माहिती मिळाली आहे. मारहाणीनंतर तो घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सध्या निलेश घायवळला किती गंभीर इजा झाली आहे, त्याच्यावर कोणत्या शस्त्राने हल्ला करण्यात आला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.


Tags: ,
Scroll to Top