Home / Crime / पुण्यातील 59 वर्षीय महिलेला डंपरने चिरडले

पुण्यातील 59 वर्षीय महिलेला डंपरने चिरडले

पुणे : गंगाधाम चौकाजवळ बुधवारी मध्यरात्री 12.50 च्या सुमारास मार्केट यार्डात वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने मोटारसायकलला मागून धडक दिली.

या धडकेत 59 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर तिची सून गंभीर जखमी झाली.

अशोक छोटेलाल महातो (37, रा. बावधन बुद्रुक) असे डंपर चालकाचे नाव आहे.

त्याला जवळच्या पोलीस ठाण्यात ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

स्थानिकांनी दगडफेक करून घटनास्थळी दिसलेल्या डंपरची तोडफोड केली.


Tags: , ,
Scroll to Top