एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी, दक्षिण पश्चिम वायु कमांडचे कमांडिंग-इन-चीफ, यांनी लोहेगाव एअर फोर्स स्टेशनला भेट दिली. त्यांचे स्वागत एअर कमोडोर सतबीर सिंग राय (वीएम) यांनी केले.
या दौऱ्यात त्यांनी तळाची परिचालन तयारी पाहणी केली आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच, भारतीय वायूदलासमोर उभ्या असलेल्या आगामी आव्हानांवर त्यांनी प्रकाश टाकला.