Home / Politics / मी बोलतो, ते करतो! अजितदादांचा जलप्रकल्प पूर्णतेच्या मार्गावर

मी बोलतो, ते करतो! अजितदादांचा जलप्रकल्प पूर्णतेच्या मार्गावर

Ajitdada's water project is on the way to completion.

Baramati: बारामती तालुक्यातील सुपे परिसरातील बोरकरवाडी तलावात जनाई उपसा सिंचन योजनेचे पाणी पाईपलाईनद्वारे सोडण्यात आले. टीसीएस फाउंडेशनच्या सीएसआर निधीतून सुमारे २.९० कोटी रुपये खर्चून १३०० मीटर पाइपलाईनचे काम पूर्ण झाले असून उर्वरित २०० मीटर काम लवकरच पूर्ण होणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

यावेळी बोलताना पवार म्हणाले, “मी जे बोलतो ते १०० दिवसात करुन दाखवतो.” विमानतळासह विविध प्रकल्पांचा उल्लेख करत त्यांनी जातीय सलोखा राखण्याचे आणि गरिबांवर अन्याय होऊ न देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या मिश्किल शैलीत काकांचा उल्लेख करत उपस्थितांमध्ये हशा पिकला.


Tags: , ,
Scroll to Top