Home / Crime / आंबेगाव वार्ता : काळूबाई मंदिरातून दीड लाख रुपये किमतीचे सोने व साउंड सिस्टीम चोरीला

आंबेगाव वार्ता : काळूबाई मंदिरातून दीड लाख रुपये किमतीचे सोने व साउंड सिस्टीम चोरीला

आंबेगाव : काळूबाईच्या मंदिराचा दरवाजा अज्ञात चोरट्यांनी तोडल्याची धक्कादायक घटना आंबेगाव येथे गुरुवारी सकाळी घडली . (पुणे क्राईम न्यूज)

काळूबाईच्या मंदिरातील साऊंड सिस्टीमसह 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण दीड लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

गुरुवार 11/07/2024 रोजी सकाळी 7:30 वाजता मंदिराचे पुजारी किसन नरवडे आणि गायकवाड बाबा पूजा करण्यासाठी गेले असता त्यांना दरवाजाचा कडीकोयंडा तोडून दरवाजा उघडा दिसला. किसन नरवडे यांनी नितीन नरवडे यांना फोन करून माहिती दिली.


Tags: ,
Scroll to Top