महाळुंगे येथील एस के एस फास्टनर्स लिमिटेड युनिट टू या कंपनीत काम करणाऱ्या दोन कामगारांनी कंपनीचा विश्वासघात करत साडेतीन लाख रुपयांचे कार्बाईट धातूचे तुकडे चोरल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. ही घटना 5 जानेवारी 2024 ते 16 ऑगस्ट 2024 या कालावधीत घडली आहे.
अटक केलेल्या आरोपींची नावे दिनेश कुमार (वय 24) आणि दिलीप सिंग शेखावत (वय 42) अशी आहेत. याप्रकरणी फॅक्टरी मॅनेजर नरेश कुमार कुंदनलाल राठी यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, आरोपींनी मागील सात महिन्यांत तब्बल 220 कार्बाईट धातूचे तुकडे चोरले, ज्याची किंमत 3 लाख 52 हजार रुपये आहे.
Read Also – Pune Crime : १२ वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार, पहाटे ५ वाजता टीव्ही रूममध्ये
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.