ठाणे रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले आहेत . ठाकुर्ली येथे ओव्हरहेड वायर तुटल्याने ठाणे स्थानकावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू झाले असून मुंबईकरांसह ठाणेकरांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानकात प्रचंड गर्दी असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.