दिल्लीतील एका कोचिंग सेंटरमध्ये सोमवारी ५ ऑगस्ट रोजी झालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आणि राज्य सरकारला नोटीस बजावली. कोचिंग सेंटर्सचे अग्निसुरक्षा नियम पाळले जात नसल्याचं कोर्टाने सांगितलं आणि कोचिंग सेंटर फेडरेशनला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला.
सुरक्षेचे निकष पूर्ण करता येत नसतील, तर ऑनलाइन शिक्षणाला प्रोत्साहन देणे योग्य ठरेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. दिल्लीतील ओल्ड राजेंद्र नगर येथील कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. न्यायालयाने या घटनेला सर्वांसाठी वेक अप कॉल म्हणून संबोधले आणि केंद्र आणि दिल्ली सरकारला विचारले की आतापर्यंत कोणते सुरक्षेचे नियम सेट केले गेले आहेत आणि त्यांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी कोणती प्रभावी यंत्रणा ठेवली गेली आहे.
त्यातच कोचिंग सेंटरच्या तळघरात मुसळधार पावसामुळे पाणी साचले, त्यामुळे विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली असून काहींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. याप्रकरणी न्यायालय दिल्ली सरकारला जबाबदार धरण्याचा प्रयत्न करत आहे.