Home / Crime / Rajshree Munde Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या भीषण अपघात

Rajshree Munde Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या भीषण अपघात

Dhananjay Munde's wife Rajshree Munde's tragic accident

Pune: पुण्यातील अपघातांचे सत्र सुरूच आहे, आणि आता पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी येथे धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात गुरुवारी, 17 ऑक्टोबर रोजी पहाटे झाला.

कार आणि ट्रॅव्हल्स बस यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत कारचा चक्काचूर झाला, तर ट्रॅव्हल्सचेही मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, राजश्री मुंडे या किरकोळ जखमी झाल्या आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

ही घटना पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी येथे घडली, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले.


Tags: , , , ,
Scroll to Top