डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने कर्मचाऱ्यांच्या खर्चात २५% कपात करण्याच्या मीडिया रिपोर्ट्सचे खंडन करताना ते “पूर्णपणे चुकीचे” असल्याचे स्पष्ट केले आहे. बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार काही वरिष्ठ कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले, आणि काहींना स्वेच्छानिवृत्तीची ऑफर दिली गेल्याचा दावा करण्यात आला होता.
कंपनीने मात्र Q3 तिमाहीत २% नफा वाढ जाहीर केली असून, एकूण महसूल ₹८,३५८.६ कोटी झाला आहे. ही वाढ निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी (NRT) पोर्टफोलिओ खरेदी, भारतातील आणि इतर उदयोन्मुख बाजारांतील उत्पन्नामुळे झाली आहे. जागतिक जेनेरिक्स विभागात १७% आणि API विभागात ५% महसूल वाढ नोंदवण्यात आली आहे.