बॉलीवूडची दिग्दर्शिका, लेखिका आणि कोरिओग्राफर फराह खान दुःखात कोसळली आहे. फराह खान आणि साजिद खान यांची आई मोनिका इराणी यांचे निधन झाले आहे.
काही आठवड्यांपूर्वी फराह खानने तिची आई मोनिका इराणी यांचा वाढदिवस साजरा करताना ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला होता. फराह खानने या पोस्टमध्ये म्हटले आहे की, माझे माझ्या आईवर खूप प्रेम आहे.
मोनिका इराणी यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते, गेल्या महिन्यात त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती, शस्त्रक्रियेमुळे त्यांची प्रकृती खूपच नाजूक झाली होती. वाढदिवसाच्या दिवशी मोनिका इराणी रुग्णालयातून घरी आल्या होत्या. आणि वाढदिवसाच्या दोन आठवड्यांनंतर मोनिका इराणीने जगाचा निरोप घेतला.
फराह खानला पाठिंबा देण्यासाठी बॉलिवूडचे सर्व सेलिब्रिटी तिच्या घरी पोहोचले आहेत.