Home / Crime / Katraj Crime: प्रियकराच्या मदतीने पतीचा खून; पती करत नव्हता संतुष्ट

Katraj Crime: प्रियकराच्या मदतीने पतीचा खून; पती करत नव्हता संतुष्ट

katraj-crime-murder-of-husband-with-the-help-of-lover

Katraj News: पुण्यातील वारजे परिसरात घडलेल्या एका धक्कादायक प्रकरणात, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. (katraj husband murder) राणी गोपीनाथ इंगुळकर आणि तिचा प्रियकर नितीन शंकर ठकार यांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. 23 सप्टेंबर रोजी गोपीनाथ बाळू इंगुळकर यांचा मृतदेह त्यांच्या घरी सापडल्यानंतर ही घटना समोर आली. (warje husband murder)

सुरुवातीला राणीने गोपीनाथने आत्महत्या केल्याचा दावा केला होता, मात्र शवविच्छेदन अहवालात गळा दाबून हत्या केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तपासाच्या दिशेला वेगळे वळण लागले. पुढील चौकशीत राणीने हत्येची कबुली दिली आणि गोपीनाथ त्यांच्या नात्यात अडथळा ठरत असल्याने खून केल्याचे सांगितले.

पोलिसांनी राणी आणि नितीन यांना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.


Tags: , ,
Scroll to Top