भारतामध्ये 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना सुरू केली आहे. या कार्डाद्वारे ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारच्या सेवांचा लाभ मिळतो, जसे की रेल्वे आणि विमान प्रवासात सवलत, सरकारी रुग्णालयात मोफत उपचार, एफडीवर जास्त व्याज, आणि इतर विविध सरकारी योजनांचा लाभ.
ज्येष्ठ नागरिक कार्डाचे फायदे:
- रेल्वे भाड्यात सवलत: ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात विशेष सवलत मिळते.
- विमान प्रवासात सवलत: विमान तिकिटांवर देखील सवलत उपलब्ध आहे.
- मोफत आणि सवलतीच्या दरात उपचार: सरकारी रुग्णालयात मोफत आणि खासगी रुग्णालयात सवलतीच्या दरात उपचार मिळतात.
- अधिक व्याज: एफडीवर सामान्य लोकांपेक्षा जास्त व्याज मिळते.
- सरकारी कंपन्यांमध्ये सवलत: एमटीएनएल आणि बीएसएनएल यांसारख्या सरकारी कंपन्यांच्या सेवांमध्ये सवलत.
अर्ज करण्याची प्रक्रिया:
- ज्येष्ठ नागरिक आपल्या राज्याच्या सरकारी वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. अधिकृत वेबसाईटवर जाऊन “New Registration” या पर्यायावर क्लिक करून अर्ज भरावा.
- अर्जात संपूर्ण माहिती भरावी लागते, जसे की नाव, जन्मतारीख, रक्तगट, पत्ता, संपर्क क्रमांक इ.
- आवश्यक कागदपत्रे, जसे की वयोमानाचा पुरावा, रहिवासी प्रमाणपत्र, वैद्यकीय तपशील, अपलोड करणे आवश्यक आहे.
पात्रता:
- अर्जदाराचा वय 60 वर्षांपेक्षा जास्त असावा.
- अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
हे कार्ड मिळवल्याने ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात दिलासा मिळतो.