Home / Top Stories / मनोज जरंगे पाटील मोर्चा पुणे, वाहतुकीत बदल

मनोज जरंगे पाटील मोर्चा पुणे, वाहतुकीत बदल

Manoj Jarange Patil Morcha Pune, Changes in transportation

मनोज जरंगे यांच्या नेतृत्वाखाली आज पुण्यात शांतता रॅली काढण्यात आली आहे. सकाळी 11 वाजता सारसबाग येथून रॅलीला सुरुवात होणार असून डेक्कनच्या खंडूजी बाबा चौकात सायंकाळी 6 वाजता समारोप होणार आहे. या रॅलीमुळे शहरातील वाहतुकीत अनेक बदल करण्यात आले आहेत, त्यामुळे पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

रॅलीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मी रोड आणि बेलबाग चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहणार आहे, तसेच मंगला टॉकीज आणि शिवाजीनगर कोर्टाकडून वाहतूक बंद राहणार आहे. या रॅलीत मनोज जरांगे नेमके काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.


Tags: ,
Scroll to Top