अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवरील दाणेवाडीत माऊली गव्हाणे यांच्या निर्घृण खूनप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सागर गव्हाणे (वय 20) या आरोपीला अटक केली आहे.
तपासात समोर आले की, समलैंगिक संबंध उघडकीस येऊ नयेत म्हणून सागर आणि त्याच्या मित्रांनी इलेक्ट्रिक कटरच्या सहाय्याने माऊलीचा खून केला. पोलिसांनी आणखी तीन आरोपींचा शोध सुरू केला असून, लवकरच त्यांना अटक केली जाईल.