पुणे महापालिकेने अंशदायी वैद्यकीय साहाय्य योजना आणि शहरी गरीब योजनेद्वारे गेल्या 6 वर्षांत नागरिकांच्या आरोग्यावर एकूण 733.71 कोटी रुपये खर्च केले.
या योजनांमधून आजी-माजी कर्मचारी, नगरसेवक आणि गरीब कुटुंबांना उपचारासाठी आर्थिक मदत मिळते. संगणकीकरणामुळे गैरप्रकार रोखण्यात मदत झाली असून, या योजना आणखी प्रभावीपणे राबवण्याचा आरोग्य विभागाचा मानस आहे.