येरवडा, पुणे येथील सेलिब्रम आयटी पार्कमधील हॉटेल युनिकॉर्न हाऊस येथे 11 एप्रिलच्या मध्यरात्री वाद आणि भांडणाची घटना घडली.
पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली, मात्र कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. या हॉटेलवर यापूर्वीही गुन्हे व खटले दाखल असल्याने दारूबंदी कायद्यानुसार पोलिसांनी हॉटेल सील केले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके यांनी दिली.