Home / Crime / Pune Gambling Adda: जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत एकाचा मृत्यू

Pune Gambling Adda: जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत एकाचा मृत्यू

Pune Gambling Adda

Pune: पुण्यातील नाना पेठ परिसरातील एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत एका ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मृत व्यक्तीचे नाव ब्रायन रुडॉल्फ गियर असून, तो पळून जाण्याच्या प्रयत्नात इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्यामुळे गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकल्यावर गोंधळ उडाला, आणि या गोंधळात ब्रायनने पळून जाण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार नाना पेठेतील क्राइस्ट चर्चसमोरील एका सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर घडला.

सध्या पोलिसांनी जुगार अड्ड्याचा संचालक आणि इतर आरोपींच्या शोधासाठी तपास सुरू केला आहे.


Tags: ,
Scroll to Top