Home / Crime / Rajgurunagar Crime: अल्पवयीन मुलीचा हत्या आणि अत्याचाराचा प्रयत्न

Rajgurunagar Crime: अल्पवयीन मुलीचा हत्या आणि अत्याचाराचा प्रयत्न

Rajgurunagar Crime

Rajgurunagar Crime News: दि. १२ एप्रिल रोजी मांजरेवाडी (ता. खेड) येथे एका महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रात आढळून आला. पोलिसांनी नवनाथ कैलास मांजरे (वय २९) या आरोपीला अटक केली असून, त्याला ८ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

मुलगी ११ वीची परीक्षा देऊन क्लाससाठी महाविद्यालयात आली होती. सकाळी घरी जाण्यासाठी थांबलेली असताना आरोपीने तिला दुचाकीवर बसवून उसाच्या शेतात नेले. तेथे अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. नकार दिल्यावर आरोपीने तिच्या डोक्यात दगड मारून खून केला आणि मृतदेह नदीत टाकला.

लैंगिक अत्याचार झाला का, याचा पीएम रिपोर्ट येणे बाकी आहे. आरोपी सध्या उलटसुलट माहिती देत असून तपास सुरु आहे.
दुसऱ्या दिवशी पीडित मुलीच्या बहिणीचा साखरपुडा होता, त्यामुळे संपूर्ण गावावर दुःखाचे सावट पसरले आहे. आरोपी गावातच वावरत होता व सामान्य वागणूक दाखवत होता, ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप उसळला असून आरोपीला फाशीची मागणी होत आहे.


Tags: , ,
Scroll to Top