खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल हॅक झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे . याबाबतची माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडियावर दिली आहे.
आपला फोन आणि व्हॉट्सॲप हॅक झाल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे, त्यामुळे त्यांना मेसेज करू नका किंवा फोन करू नका असं आवाहनही त्यांनी केलं आहे. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. या संदर्भात पुढील तपास सुरू असून पुढील कारवाई सुरक्षा यंत्रणा करत आहेत.