पुणे शहरात मोठ्या पावसामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्यानंतर, पश्चिम घाटावर आणि पुण्यातील धरणांमध्ये प्रचंड पाऊस झाला आहे. यामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. काल संध्याकाळी सहा वाजता 31 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता, जो रात्री 35 हजार क्युसेकपर्यंत वाढला.
मुठा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढल्यामुळे नदीकाठच्या रस्त्यांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पुलाची वाडी आणि सिंहगड रोड परिसरातील काही भागात पाणी शिरले आहे, मात्र सध्या पाऊस कमी झाल्यामुळे परिस्थिती काहीशी सुधारली आहे.
Read Also – महाळुंगे: कंपनीतील कामगारांचा विश्वासघात, साडेतीन लाखांचे कार्बाईट तुकडे चोरी
शहरातील प्रशासन आणि फायर ब्रिगेडची टीम सतर्क राहून नागरिकांना सूचना देत आहे. पुण्यात ऑगस्ट महिन्यातील पावसाची नोंद गेल्या चार वर्षांतील सर्वाधिक आहे, ज्यामुळे शहरात पाण्याचा स्तर वाढला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.