Pune: मुंढवा येथील सेंट ऑस्कर स्कूलजवळ ऑनलाइन गेम खेळण्यासाठी पैसे लावून कर्जबाजारी झालेल्या एका तरुणाने सासऱ्याच्या घरातून तब्बल ₹3.89 लाखांचे रोख रक्कम व दागिने चोरल्याची घटना उघडकीस आली आहे.
चोरीनंतर पोलिसात तक्रार नोंदवण्यासाठी आरोपी स्वतः सासऱ्यासोबतच पोलीस ठाण्यात गेला होता, मात्र चौकशीदरम्यान त्याच्या उलटसुलट उत्तरांमुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी चौकशी केली असता त्याच्या बॅगेतून चोरीचा मुद्देमाल सापडला. वरिष्ठ निरीक्षक निळकंठ मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला अवघ्या काही तासांत अटक करण्यात आली.