पुण्यातील अन्न प्रक्रिया युनिटमधून अमोनिया गॅस गळती झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या गॅस गळतीमुळे 15 महिला आणि एकूण 17 जण गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेच्या वेळी तेथे 25 लोक काम करत होते, त्यात बहुतांश महिला कामगार होत्या. रेडी टू इट फूड कारखान्यात ही घटना घडली असून एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
या अपघाताने परिसरात खळबळ उडाली असून जखमींवर तातडीने उपचार सुरू आहेत.