इंद्रायणी नदीच्या ब्लू लाईनलगत पिंपरी-चिंचवडमधील चिखली परिसरातील २९ बंगले पाडण्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे . हे बंगले पाडण्याचे आदेश हरित लवादाने यापूर्वीच पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.
या आदेशाविरोधात स्थानिक रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र त्यांना उच्च न्यायालयाकडूनही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हे बंगले पाडण्यात येणार आहेत.
या बंगल्यांच्या बांधकामाला जबाबदार असलेल्या जमीनमालकावर कारवाई करण्याची मागणीही स्थानिक रहिवासी करत आहेत. याशिवाय बंगल्यांच्या मालकांना ५ कोटी रुपयांचा दंडही भरावा लागणार आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.