पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्यात पावसाळ्यातील वाढत्या आजारांमुळे सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत. पुण्यात जुलै अखेरपर्यंत झिका विषाणूचे ६६ रुग्ण आढळून आले आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये दोन रुग्ण आढळले आहेत , तर पुण्यातील ग्रामीण भागात पाच रुग्ण आढळले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुणे शहर आणि जिल्ह्यात झिका व्हायरस, चिकुनगुनिया आणि कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
याशिवाय थंडीच्या तापाचे प्रमाणही वाढत असून, राज्यभरात 9 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.