Home / Top Stories / Pune Camp Burger: अमेरिकन बर्गर किंगला पुणेरी दणका, आंतरराष्ट्रीय ब्रँडविरोधात मोठा विजय

Pune Camp Burger: अमेरिकन बर्गर किंगला पुणेरी दणका, आंतरराष्ट्रीय ब्रँडविरोधात मोठा विजय

पुण्यातील कॅम्प परिसरात असलेल्या बर्गर किंग रेस्टॉरंटने अमेरिकन बर्गर किंग कंपनीविरोधातील खटला अखेर जिंकला आहे. हा वाद तब्बल 13 वर्षे पुणे कोर्टात प्रलंबित होता. दोन्ही कंपन्यांकडे समान नाव असल्यामुळे हा वाद सुरू झाला होता. अखेर कोर्टाने पुण्याच्या बर्गर किंगच्या बाजूने निकाल दिला आहे, ज्यामुळे त्यांना आपले नाव वापरण्याचा अधिकार मिळाला आहे.

या निकालामुळे पुणेरी रेस्टॉरंटला आंतरराष्ट्रीय ब्रँडविरोधात मोठा विजय मिळाला असून, यामुळे ग्लोबल ब्रँडला पुणेरी धक्का बसल्याची चर्चा आहे. पुण्यातील कॅम्प परिसरातील हे रेस्टॉरंट, “बर्गर किंग,” गेली अनेक वर्षे स्थानिकांमध्ये लोकप्रिय आहे. अमेरिकन बर्गर किंगने या नावाचा वापर त्यांच्या ट्रेडमार्क हक्कांवर दावा करून कोर्टात चालवला होता, पण कोर्टाने पुण्याच्या बर्गर किंगच्या बाजूने निर्णय दिला आहे.

यामुळे पुण्यातील बर्गर किंग रेस्टॉरंटचे मालक आणि त्यांच्या ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, आणि आता हे रेस्टॉरंट त्यांच्या मूळ नावाने कार्यरत राहणार आहे.


Tags:
Scroll to Top